ताज्या घडामोडी
Trending

काँग्रेसकडून अपेक्षा नाही पण शरदराव तुम्हाला हे शोभतं का? : नरेंद्र मोदी

लातूर येथील औसा येथे आज महायुतीची जाहीर प्रचार सभा झाली. यामध्ये लातूर आणि उस्मानाबदच्या उमेदवारांसाठी प्रचार करण्यात आला.

काँग्रेस आणि त्यांच्या महामिलावट सहकाऱ्यांकडून देशाच्या सुरक्षेची अवस्था बिकट बनली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस जम्मू-काश्मीरसाठी वेगळा पंतप्रधान पाहिजे असलेल्यांच्या बाजूने उभी आहे, असा आरोप करताना काँग्रेसकडून लोकांना अपेक्षा नाही मात्र, शरदराव तुम्हाला हे शोभतं का? असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित केला आहे.

लातूर येथील औसा येथे आज महायुतीची जाहीर प्रचार सभा झाली, यावेळी मोदी बोलत होते. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवरुन काँग्रेससह महाआघाडीवर सडकून टीका केली. लातूर आणि उस्मानाबदच्या उमेदवारांसाठी ही प्रचार घेण्यात आली. दरम्यान, भाजपा-शिवसेनेच्या युतीनंतर उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी एकाच मंचावर एकत्र आले. यावेळी मोदींनी उद्धव ठाकरेंना छोठा भाऊ म्हणून संबोधले.

मोदी म्हणाले, काँग्रेसने जर देशाची फाळणी होऊ नये यासाठी १९४७मध्ये एकजूट झाली असती तर पाकिस्तान निर्माणच झाला नसता. काँग्रेसने आपला चेहरा आरशात पहावा कारण त्यांना मानवाधिकाराची भाषा शोभत नाही. त्यांनी बाळासाहेब ठाकरेंचाही मतदानाचा हक्क हिरावून घेतला होता. आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस काश्मीरमधील फुटिरतावाद्यांसोबत आहे. काँग्रेसकडून लोकांना आता अपेक्षा नाही, मात्र शरदराव तुम्ही तरी हे शोभतं का? असा सवाल यावेळी त्यांनी केला.

मोदी पुढे म्हणाले, सशक्त भारत बनवण्याचा संकल्प आम्ही देशासमोर ठेवला आहे. तसेच सुशासन हाच आमचा मंत्र आहे. या भावनेनेच नव्या भारताच्या निर्माणासाठी आम्हाला देशातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग हवा आहे. एकीकडे आमच्याकडे धोरण आणि दुसरीकडे विरोधकांची विरोधी भूमिक आहे. दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर घुसून मारू ही नव्या भारताची निती असल्याचा पुनरुच्चार मोदींनी यावेळी केला.

जम्मू-काश्मीरमध्ये आम्ही राष्ट्रवादाची भावना रुजवली तिथली परिस्थिती आता सामान्य आहे. घुसखोरी पूर्णपणे बंद करण्याचा आमचा संकल्प आहे. नक्षलींवर प्रहार करणे आणि आदिवासींपर्यंत विकास पोहोचवण्यासाठी आम्ही दिवसरात्र मेहनत घेतली आहे. देशाचा सांस्कृतिक वारसा जगात पोहोचवण्याचे काम आम्ही केले. मात्र, काँग्रेस आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा देशविरोधी विचार आहे. त्यांच्या घोषणापत्रातील भाषा ही पाकिस्तानची भाषा आहे. दहशतवाद्यांना प्रोत्साहन देण्याचा काँग्रेसचा मानस आहे. अशा काँग्रेसवर तुम्ही विश्वास करु शकता का? असा सवाल यावेळी मोदींनी जनतेला विचारला.

कृपया शेअर करा
Show More

Admin

नमस्कार सीसोदे फाउंडेशन व्यसन मुक्ति के लिये काय॔रत हैं । अब तक 40000 लोगों तक पहुँच पायें हैं । यह काम राष्ट्रीय स्तर पर पहुँचने के लिए आपके साहयता की आवश्यकता है । जो लोग समाज के प्रति जिम्मेदारी निभाने के लिए तैयार है कृपया सह योग करें ! क्योंकि व्यसन मात्र शरीर को ही हानि पहुँचाते हैं,ऐसी बात नहीं है। इससे भी बढ़कर तो ये सर्वोत्तम एवं दुर्लभ मनुष्य जन्म को व्यर्थ में ही नष्ट कर डालते है ! चलो व्यसन मुक्त भारत की ओर यह एक अभियान भी हैं ओर पुन्यकम॔ भी । ईस अभियान में शामिल होने के लिए आपको छोटी छोटी सहायता कर सकते हैं । 1) हमारा WHAT'S UP नंबर आपके गृप में शामिल करें । ईस 7373731475 नंबर से व्यसन मुक्ति के लिए सहयोगी विचार तथा विनामुल्य औषधि दि जाति हैं । 2) आप हमारे FACEBOOK पेज SISODE FOUNDATION से जुड़ सकते हैं । 3) हमारे YOUTUBE CHANNEL से जुड़ सकते हैं https://www.youtube.com/channel/UCiktYmB3P2cZ2fZ8HpSMOgA कृपया ईस काय॔ में सहयोग करें आपके एक कदम किसी के घर में उजाला ला सकता है । धन्यवाद ।

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close