क्राईम स्टोरीमहाराष्ट्र
Trending

अल्पवयीन मुलीचा गर्भपात?

पालघर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद

प्रतिनिधी : पालघरमधील एका खासगी नर्सिग होममध्ये एका अल्पवयीन व अविवाहित मुलीचा गर्भपात करण्यात आला असून याविषयी पालघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी तपासणी करण्यासाठी मुंबईच्या जे. जे. रुग्णालयात गर्भाचे नमुने पाठवण्यात आले असून या अल्पवयीन मुलीच्या वयाचा दाखला व पुरावे गोळा करण्यास पोलीस अधिकारी प्रयत्नात आहेत.

पालघरमधील एका खासगी नर्सिग होममध्ये ५ एप्रिल रोजी एका महिलेला रक्तस्रावाच्या तक्रारीवर उपचार करण्यासाठी दाखल केले. या महिलेने मुदतपूर्व अर्भकाला जन्म दिला आणि ते काही वेळातच मृत झाले. या महिलेचा गर्भपात केला असल्याची तक्रार पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात करण्यात आली आहे. या महिलेचे वय १९ वर्षे असल्याचे तिच्या पालकांनी डॉक्टरांना सांगितले. मात्र ही महिला अल्पवयीन आणि अविवाहित असल्याची माहिती स्थानिक नागरिकांकडून कळाली आहे. त्यांनी पालघर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्ह्य़ाची नोंद केली. याप्रकरणी वैद्यकीय अधिकाऱ्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. या महिलेच्या वयनिश्चितीसाठी तिला मुंबईच्या जे. जे. रुग्णालयात पाठवण्यात येत असल्याचे पालघर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. दिनकर गावीत यांनी सांगितले.

या महिलेचा जन्म दाखला तसेच जे. जे. रुग्णालयातील वयाच्या अहवालानुसार ही महिला अल्पवयीन असल्याचे सिद्ध झाल्यास संबंधितांविरुद्ध ‘पोस्को’ कायदाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येईल, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. या मुलीचा जन्म मार्च २००२ मध्ये झाल्याचा दाखला पालघरच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे सदार करण्यात आला असून यासंदर्भात गर्भपात करणाऱ्या डॉक्टरची चौकशी करण्यात येणार आहे.

कृपया शेअर करा
Show More

Admin

नमस्कार सीसोदे फाउंडेशन व्यसन मुक्ति के लिये काय॔रत हैं । अब तक 40000 लोगों तक पहुँच पायें हैं । यह काम राष्ट्रीय स्तर पर पहुँचने के लिए आपके साहयता की आवश्यकता है । जो लोग समाज के प्रति जिम्मेदारी निभाने के लिए तैयार है कृपया सह योग करें ! क्योंकि व्यसन मात्र शरीर को ही हानि पहुँचाते हैं,ऐसी बात नहीं है। इससे भी बढ़कर तो ये सर्वोत्तम एवं दुर्लभ मनुष्य जन्म को व्यर्थ में ही नष्ट कर डालते है ! चलो व्यसन मुक्त भारत की ओर यह एक अभियान भी हैं ओर पुन्यकम॔ भी । ईस अभियान में शामिल होने के लिए आपको छोटी छोटी सहायता कर सकते हैं । 1) हमारा WHAT'S UP नंबर आपके गृप में शामिल करें । ईस 7373731475 नंबर से व्यसन मुक्ति के लिए सहयोगी विचार तथा विनामुल्य औषधि दि जाति हैं । 2) आप हमारे FACEBOOK पेज SISODE FOUNDATION से जुड़ सकते हैं । 3) हमारे YOUTUBE CHANNEL से जुड़ सकते हैं https://www.youtube.com/channel/UCiktYmB3P2cZ2fZ8HpSMOgA कृपया ईस काय॔ में सहयोग करें आपके एक कदम किसी के घर में उजाला ला सकता है । धन्यवाद ।

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close