ताज्या घडामोडीनागरिकांसाठीमहाराष्ट्र

नरेंद्र मोदी हे केवळ संकट नाही, तर राष्ट्रीय आपत्ती आहे – शरद पवार

संयुक्त पुरोगामी आघाडी समर्थित उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ येथील संत ज्ञानेश्वर सभागृहात आयोजित मेळाव्यात ते बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेहमी काँग्रेस सरकारच्या काळात काहीच झाले नाही, असे सांगत फिरतात. पण, गेल्या पाच वर्षांत त्यांनी काय दिवे लावले हे सांगत नाहीत. नरेंद्र मोदी हे केवळ संकट नाही, तर राष्ट्रीय आपत्ती आहे, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी येथे केली.

संयुक्त पुरोगामी आघाडी समर्थित उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ येथील संत ज्ञानेश्वर सभागृहात आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी उमेदवार नवनीत राणा, आमदार रवि राणा, राष्ट्रवादीचे नेते अरुण गुजराथी, अनिल देशमुख, हर्षवर्धन देशमुख, शरद तसरे, वसुधा देशमुख,  काँग्रेसचे नेते डॉ. देवीसिंह शेखावत, रावसाहेब शेखावत, केवलराम काळे, राजकुमार पटेल आदी उपस्थित होते.

शरद पवार म्हणाले, आजवर देशात विरोधकांचाही सन्मान केला जात होता. पण, या सरकारच्या काळात सत्तेचा मोठय़ा प्रमाणात गैरवापर करण्यात आला.  संसदीय लोकशाहीतील संस्था उद्ध्वस्त करण्याचे काम या सरकारने केले. आम्ही सर्व विरोधकांनी सशक्त असा पर्याय उभा केला आहे, आम्हाला ते ‘मिलावट’ संबोधतात. आम्ही २६ राष्ट्रीय पक्ष एकत्र आलो आहोत, पण एनडीएत ३६ पक्ष आहेत, हे पंतप्रधानांनी विसरू नये. आम्ही २००४ मध्ये संयुक्त पुरोगामी आघाडी तयार केली, दहा वर्षे देशात चांगले सरकार दिले. सरकार चांगल्या पद्धतीने चालवण्याचा अनुभव आमच्याकडे आहे.

लोकशाहीला संसदीय पद्धतीने दिशा देण्याचे काम जवाहरलाल नेहरू यांनी केले. इंदिरा गांधी यांनी देशाचा इतिहासच नाही, तर भूगोल बनवला. राजीव गांधी यांनी आधुनिकतेची कास धरल्याने आज देशात तंत्रज्ञानाचा विकास झाला. त्यांनी देशासाठी योगदान दिले. तरीही पंतप्रधान  देशात गेल्या साठ वर्षांत काय केले अशी भाषा करतात, हे कोणालाही न पटणारे आहे. नरेंद्र मोदी काल-परवा वर्धेला जाऊन आले. पण, ते सेवाग्रामला गेले नाहीत. मी गांधीवादी असल्याचे ते सांगतात, पण गांधींना विसरतात. काहीही म्हणा, नाटके करायला हा भारी माणूस आहे, अशा शब्दात शरद पवार यांनी नरेंद्र मोदींवर शरसंधान साधले. मोदी यांनी माझ्या घराची चिंता करू नये, ते सांभाळण्यासाठी मी समर्थ आहे, असे प्रत्युत्तरही त्यांनी दिले.

रवि राणा यांना कानपिचक्या

आमदार रवि राणा यांनी  भाजप सरकारला समर्थन दिले होते, याचा संदर्भ देत शरद पवार यांच्यासह अनेक वक्त्यांनी त्यांना कानपिचक्या दिल्या. आता तरी भलत्याच मार्गाने जाऊ नका, असे शरद पवार म्हणाले. पवार यांच्याकडे सर्व ठिकाणी लागणारा मोठा पाना आहे, त्यामुळे रवि राणा यांनी भविष्यात दुसरा विचार करू नये, असा सल्ला अनिल देशमुख यांनी दिला. रिपाइंचे डॉ. राजेंद्र गवई यांनी देखील रवि राणा आघाडी सोडून जाणार नाहीत, कारण त्यांचा नट शरद पवार कसणार आहेत, असा टोला लगावला.

कृपया शेअर करा
Show More

Admin

नमस्कार सीसोदे फाउंडेशन व्यसन मुक्ति के लिये काय॔रत हैं । अब तक 40000 लोगों तक पहुँच पायें हैं । यह काम राष्ट्रीय स्तर पर पहुँचने के लिए आपके साहयता की आवश्यकता है । जो लोग समाज के प्रति जिम्मेदारी निभाने के लिए तैयार है कृपया सह योग करें ! क्योंकि व्यसन मात्र शरीर को ही हानि पहुँचाते हैं,ऐसी बात नहीं है। इससे भी बढ़कर तो ये सर्वोत्तम एवं दुर्लभ मनुष्य जन्म को व्यर्थ में ही नष्ट कर डालते है ! चलो व्यसन मुक्त भारत की ओर यह एक अभियान भी हैं ओर पुन्यकम॔ भी । ईस अभियान में शामिल होने के लिए आपको छोटी छोटी सहायता कर सकते हैं । 1) हमारा WHAT'S UP नंबर आपके गृप में शामिल करें । ईस 7373731475 नंबर से व्यसन मुक्ति के लिए सहयोगी विचार तथा विनामुल्य औषधि दि जाति हैं । 2) आप हमारे FACEBOOK पेज SISODE FOUNDATION से जुड़ सकते हैं । 3) हमारे YOUTUBE CHANNEL से जुड़ सकते हैं https://www.youtube.com/channel/UCiktYmB3P2cZ2fZ8HpSMOgA कृपया ईस काय॔ में सहयोग करें आपके एक कदम किसी के घर में उजाला ला सकता है । धन्यवाद ।

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close