ताज्या घडामोडी
Trending

महिलांविरुद्ध गुन्हे घडावेत यासाठी कठोर कायदे केले; भाजपाच्या संकल्पपत्रात घोडचूक

या चुकीवरून काँग्रेस आणि आपने भाजपाला सुनावले आहे

गरीब, शेतकरी आणि मध्यमवर्गाच्या ‘सशक्ती’करणाचा दावा करणारे भाजपचे लोकसभा निवडणुकीचे सर्वसमावेशक ‘संकल्पपत्र’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी प्रसिद्ध करण्यात आले. काँग्रेसच्या ‘विकासाच्या पंचसूत्री’ला आव्हान देण्याचा ‘संकल्प’ भाजपने या जाहीरनाम्याद्वारे केला आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबरच, भाजपा अध्यक्ष अमित शहा आणि जाहीरनामा समितीचे प्रमुख राजनाथ सिंह हेही उपस्थित होते. यावेळी सर्वच नेत्यांनी पाच वर्षांमध्ये सरकारने केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडत पुढील पाच वर्षांच्या योजनांबद्दलची माहिती दिली. यामध्ये राष्ट्रीय सुरक्षा, शेती, उद्योग, शिक्षण, महिला सुरक्षा, कायदा सुव्यवस्था, ग्रामविकास अशा अनेक मुद्द्यांचा समावेश होता. मात्र भाजपाच्या या जाहीरनाम्यामध्ये एक गंभीर चूक झाल्याचे समोर येत आहे.

भाजपाने छापलेल्या ४५ पानांच्या ‘संकल्पपत्रा’तील ३१ व्या आणि ३२ व्या पानावर महिला सुरक्षेसंदर्भातील आश्वासनांची माहिती देण्यात आली आहे. यापैकी ३२ व्या पानावरील ११ व्या मुद्द्यात भाजपाकडून एक मोठी चूक झाली आहे. ‘महिलांच्या सुरक्षेला सर्वाधिक प्राधान्य दिलं जाईल. आम्ही गृह मंत्रालयात महिला सुरक्षा विभागाची स्थापना केली आहे. तसेच महिलांविरुद्ध गुन्हे घडावेत यासाठी कठोर कायदे केले आहेत. त्यामुळे कमीतकमी वेळात तपास करुन बलात्काराच्या प्रकरणांमध्ये तातडीने सुनावणी सुरू होते. अशा गुन्ह्यांच्या तपासासाठी आवश्यक असणाऱ्या फॉरेन्सिक सुविधांमध्ये वाढ करण्यात येणार आहे. अशा प्रकरणांमध्ये न्यायदान जलदगतीने होण्यासाठी जलदगती न्यायालयांचा विस्तार करण्यात येईल,’ असं भाजपाने म्हटलं आहे.

अकराव्या मुद्द्यातील दुसऱ्या ओळीमध्ये ‘महिलांविरुद्ध गुन्हे घडावेत यासाठी कठोर कायदे केले आहेत’, असं छापण्यात आलं आहे. खरं तर ते वाक्य ‘महिलांविरुद्ध गुन्हे रोखण्यासाठी कठोर कायदे केले आहेत’ असं असणे अपेक्षित होतं.

काँग्रेसने याच मुद्द्यावरुन भाजपावर टिका केली केली आहे. या संकल्पपत्रातील चुकीच्या वाक्याचा स्क्रीनशॉर्ट ट्विटवर शेअर केला आहे. ‘भाजपाच्या जाहीरनाम्यातील एक मुद्दा तरी त्यांचा खरा हेतू काय आहे हे दर्शवतो’, असा टोला ट्विटवरुन काँग्रेसने लगावला आहे.

 

 

अरविंद केजरीवाल यांच्या ‘आम आदमी पक्षा’नेही ट्विटवरुन या चुकीवरुन भाजपावर टिका केली आहे. ‘महिलांविरुद्ध गुन्ह्यांना प्रोत्साहन देण्याचा भाजपाचा संकल्प आहे. भाजपा तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी तुमचा खरा हेतू समोर आलाच,’ अशा शब्दात ‘आप’ने भाजपावर या चुकीवरुन निशाणा साधला आहे.

या गंभीर चुकीबरोबरच भाजपाच्या जाहीरनाम्यामध्ये काही लहान चुकांही आहेत. विद्यालयास शब्दाऐवजी ‘केंद्रीय विदयाललास आणि नवोदय विदायलास’ असे शब्द २९ व्या पानावर छापण्यात आले आहेत.

कृपया शेअर करा
Show More

Admin

नमस्कार सीसोदे फाउंडेशन व्यसन मुक्ति के लिये काय॔रत हैं । अब तक 40000 लोगों तक पहुँच पायें हैं । यह काम राष्ट्रीय स्तर पर पहुँचने के लिए आपके साहयता की आवश्यकता है । जो लोग समाज के प्रति जिम्मेदारी निभाने के लिए तैयार है कृपया सह योग करें ! क्योंकि व्यसन मात्र शरीर को ही हानि पहुँचाते हैं,ऐसी बात नहीं है। इससे भी बढ़कर तो ये सर्वोत्तम एवं दुर्लभ मनुष्य जन्म को व्यर्थ में ही नष्ट कर डालते है ! चलो व्यसन मुक्त भारत की ओर यह एक अभियान भी हैं ओर पुन्यकम॔ भी । ईस अभियान में शामिल होने के लिए आपको छोटी छोटी सहायता कर सकते हैं । 1) हमारा WHAT'S UP नंबर आपके गृप में शामिल करें । ईस 7373731475 नंबर से व्यसन मुक्ति के लिए सहयोगी विचार तथा विनामुल्य औषधि दि जाति हैं । 2) आप हमारे FACEBOOK पेज SISODE FOUNDATION से जुड़ सकते हैं । 3) हमारे YOUTUBE CHANNEL से जुड़ सकते हैं https://www.youtube.com/channel/UCiktYmB3P2cZ2fZ8HpSMOgA कृपया ईस काय॔ में सहयोग करें आपके एक कदम किसी के घर में उजाला ला सकता है । धन्यवाद ।

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close