🚨 यांचे अभिनंदन इतरांचे काय

चि मयुर राजपूत व डॉक्टर कु नेहा राजपूत आपण दोघे युपिएससी परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन प्रथम श्रेणीत सनदी अधिकारी होण्याचा बहुमान मिळवला, आपल्या कुटुंबाचे व समाजाचे नाव उज्ज्वल केले त्या बद्दल आपले मनापासून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा
💐💐💐💐💐
राजपूत समाजा हा लढवय्या असलेला समाज आहे मूळ राजस्थानातून इतरस्त विखुरलेला आपण धुळे जळगाव नंदुरबार म्हणजे खानदेश व खानदेशातून गुजरात राज्यात उपजीविकेसाठी गेलेल्या श्रमिक राजपूत बांधव व संपूर्ण महाराष्ट्रावर नोकरीच्या निमित्ताने व उपजीविकेच्या निमित्ताने विखुरलेल्या राजपूत समाज विषयी खूप काही लेख येतात मात्र स्वतः अंगीकारत नसले तरी इतरांना डोस पाजणारे महानुभाव या समाजात खूप आहेत मोठमोठ्या स्टेजवरून घोषणा देखील होतात सर्वेच राष्ट्रीय आणि राज्य पातळीचे नेते समजतात (सर्वच स्वतःला राजे समजतात प्रजा कोणी समजायला तयार नाही) मात्र या समाजात वैचारिक दारिद्र्य जे पसरलेल आहे त्यावर कोणी बोलायला तयार होत नाही आपण जोवर शैक्षणिक दृष्ट्या पुढारून पुढे जात नाही त्यावर आपण भर देत नाही त्यावर आपण मेळावे घेत नाही त्याबाबतीतलं कुठलंही पाऊल उचलायला कोणीही तयार नाही वर्षातून एकदा येणाऱ्या महाराणा प्रताप जयंतीच्या निमित्ताने प्रचंड मोठ्या प्रमाणावर व्हाट्सअप युनिव्हर्सिटी वरती मोठमोठे पोस्टर आणि वायफळ खर्च केला जातो मात्र या समाजात असेही काही हिरे आहेत ज्यांच्या रक्तात अभ्यास भरलेला आहे परंतु त्यांना गरज आहे ती आर्थिक पाठबळ ची
त्यासाठी ते मागे राहिलेले आहेत मागासलेले नाहीत मागासलेला हा शब्द यासाठी वापरला आपण बामटा राजपूत या प्रमाणपत्रासाठी आणि व्हॅलिडीटी साठी खूप फिरतो खरंतर याबाबत प्रबोधन झालं पाहिजे एखादी जयंती फक्त पूजा करून मिरवणूक न काढता त्याच्यावर होणारा खर्च हा जर अशा कामासाठी वापरला गेला नियोजनासाठी खर्च केला गेला तर निश्चितपणे दोन पाच टक्क्याने का असेना समाजातील होतकरू गरीब शिक्षणापासून वंचित असलेले तमाम समाज बांधवांना याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होईल हा जसे चिरंजीव मयूर राजपूत आणि कुमारी नेहा राजपूत यांनी जी भरारी घेतली ती त्यांच्या अंगी असलेल्या गुणांमधून ते पास झाले म्हणून आपण त्यांचा गौरव करत आहोत आणि डोक्यावर धरून त्यांना नाचत आहोत असे अनेक तरुण आहेत त्यांना मार्ग सापडत नाही त्याबाबतीत विचारांची मंथनाची खूप खूप गरज आहे या गरजेला केव्हा वाट मोकळी होईल ते सांगता येत नसलं तरी समाजातील दोन पाच टक्के विचारांनी भरवलेल्या तरुणांची माझे बोलणे सुरू आहे त्यात कोणी न्यायाधीश आहे कोण मोठे वकील आहेत काही व्यावसायिक आहेत सर्वांची सुप्त भावना आणि इच्छा एकच आहे की काहीतरी काँक्रीट काम या समाजात यापुढे व्हावे जेणेकरून भरकट चाललेली तरुणाई या निमित्ताने थांबवता येईल
आपण जर या विचाराशी सहमत असाल चर्चा नको कृतीतून उतरण्याची आपली काय तयारी असेल तर आपण निश्चितपणे एका निवांत जागी बसुया चर्चा करूया आणि मार्गही काढूया
मी आपल्या प्रतीक्षेत इथेच थांबतो
या संदर्भात मागील दोन वर्षांपूर्वी छोटासा प्रयत्न केला होता त्याची एक लिंक आपणास या निमित्ताने पाठवतो त्यातून अल्प प्रमाणावर का असेना एक सेवाभावी संस्था सुरू आहे त्यातून देखील काही मार्ग निघेल
आपला रत्नदीप सिसोदिया
गरीब होतकरू मेरिटमध्ये येणाऱ्या विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना शैक्षणिक वाटचाल करण्यासाठी फी भरण्यासाठी व इतर गोष्टींच्या मदतीसाठी बिना व्याजी परतफेडच्या लेखी हमीवर या संस्थेमार्फत आर्थिक मदत केली जाईल त्याकरिता खाली दिलेल्या लिंक वर आपण आपले सविस्तर पाठविल्यास संस्थेकडून आपल्याला संपर्क करण्यात येईल योग्य ती मदत केली जाईल आर्थिक अडचणीसाठी न थांबता आपला शैक्षणिक प्रवास सुकर व्हावा या शुद्ध भावनेतून आपण सहभागी होऊ शकतात
दुसऱ्याच्या आनंदातच माझा आनंद सामावलेला आहे हा विचार सोबत घेऊन जगणं सोपं होईल त्यासाठीच हे सारं काही….
👇👇👇👇
https://docs.google.com/forms/d/1mypHe3HW1LBWLlmnw6Z4huzdNMbFsCQrlm6btXIzq9c/edit
☝️☝️☝️☝️☝️ एकदा सदरची फाईल ओपन करून पहा काही अडचणी असल्यास या नंबर वरती कळवा
धन्यवाद!
रत्नदीप सिसोदिया

Last modified: April 17, 2024

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *