*कळविण्यात दुःख होत आहे की, माळी समाजातील वैद्यकीय समाजसेवक व कळमसरे तालुका अमळनेर जिल्हा जळगाव येथील स्व. वामन डॉक्टर यांच्या *धर्मपत्नी व मुंबई स्थित फिल्म सृष्टीतील आर्ट डायरेक्टर बंडू उर्फ रमाकांत महाजन व पिंटू उर्फ संजय वामनराव महाजन यांच्या मातोश्री- ग.भा. डॉक्टर मालतीताई वामन महाजन यांचे आज दिनांक 10/9/2022 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले त्यांची अंत्ययात्रा कळमसरे तालुका अमळनेर येथून उद्या दिनांक 11 /09 /22 रोजी दुपारी 1 वाजता निघेल
शोकाकुल परिवार
बंडू उर्फ रमाकांत वामनराव महाजन मुलगा
पिंटू उर्फ संजय वामनराव महाजन मुलगा
कोकिळा अनिल महाजन मुलगी
संगीता प्रमोद पाटील मुलगी.
स्वर्गीय डॉक्टर वामनराव महाजन व मालतीताई महाजन हे दोघेही डॉक्टर असल्याने वैद्यकीय सेवेत संपूर्ण कळमसरे परिवारात व परिसरात मोठे योगदान होते ज्या काळात कुठलेही प्रकारचे साधनसामुग्री नव्हती दळणवळणाचे मार्ग बंद असायचे अशा काळात रुग्णाच्या घरी जाऊन त्यांनी सेवा दिलेली आहे त्यामुळे या परिसरात त्यांचा एक सामाजिक मोठा परिवार तयार झालेला होता आणि आहे आजही त्यांची मुले व मुली बाहेरगाव असले तरी गावाशी या परिवाराची नाळ कायम जोडलेली आहे कळमसरे गावातील प्रत्येक परिवाराला हवेहवेसे वाटणारे डॉक्टर महाजन दांपत्ये यांच्या परिवारातील दुःखद घटना ही आपल्या परिवाराशी जोडली गेल्यासारखे वाटते त्यामुळे या परिवारातील बंडू उर्फ रमाकांत व पिंटू उर्फ संजय हे दोघेही उच्चपदस्थ ठिकाणी एकाचा व्यवसाय तर दुसरा नोकरीत असताना देखील आपल्या गावातील प्रत्येकाशी नातेसंबंध ठेवून आईची सेवा करत राहिले आणि शेवटी त्या आईची अंतयात्रा ज्या ठिकाणी सेवा झाली त्या गावातूनच निघावी अशी त्यांची जी इच्छा होती ती मुलांनी पूर्ण केली त्याप्रमाणे आज रोजी त्यांची प्रेतयात्रा कळमसरे तालुका अमळनेर जिल्हा जळगाव येथून
दैनिक राष्ट्र उदय व पोलीस टुडे परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली
