गोदावरी गटारीकरण विरोधी मंच नाशिक व एचपीटी महाविद्यालय (एनसीसी, एनएसएस) यांच्या वतीने गणेश विसर्जनाच्या पाचव्या दिवशी गणेशमूर्ती संकलन

Uncategorized

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScbEHaHSsaOVnbJN4sAcm8y_V-2bnkjZmQufV6b2PMr9Lv0Ig/viewform?usp=sf_link
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScbEHaHSsaOVnbJN4sAcm8y_V-2bnkjZmQufV6b2PMr9Lv0Ig/viewform?usp=sf_link

गोदावरी गटारीकरण विरोधी मंच नाशिक व एचपीटी महाविद्यालय (एनसीसी, एनएसएस) यांच्या वतीने गणेश विसर्जनाच्या पाचव्या दिवशी गणेशमूर्ती संकलन चोपडा लॉन्स गंगापूर रोड नाशिक येथे करण्यात आले. जवळपास 300 लहान मोठ्या गणेशमूर्तींचे संकलन केले गेले.
कोरोना महामारी नंतर नागरिकांमध्ये प्रथमच चांगला उत्साह दिसून आला. यात प्रामुख्याने लहान मुलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता. नाशिक महानगर पालिका प्रशासनाने व्यवस्था योग्य प्रकारे करण्यात आली होती यात घनकचरा व्यवस्थापन व बांधकाम विभाग यांचा सहभाग होता..
गणेशमूर्ती संकलन करण्यासाठी गोदावरी गटारीकरण विरोधी मंच चे निशिकांत पगारे, एच पी टी महाविद्यालयाचे प्रा सोमनाथ मुठाळ, मेजर विष्णू उगले, सौ कांचन देसले, सचिन भामरे, संदीप कांदे, मनपा प्रशासनाने विभागीय अधिकारी हरिश्चंद्र मदन, विभागीय स्वच्छ्ता निरीक्षक संजय गोसावी, बांधकाम विभागाचे प्रशांत बोरसे तसेच सामाजिक क्षेत्रातील तुषार पिंगळे, उदय थोरात, योगेश बर्वे, संजय करंजकर, मनोज साठे, कचरू वैद्य, डॉ अजय कापडणीस, अमरीश मोरे, सुनील परदेशी, वीरेंद्र टिळे, आदी कार्यकर्ते व एन सी सी व एन एस एस चे विद्यार्थी उपस्थित होते..

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScbEHaHSsaOVnbJN4sAcm8y_V-2bnkjZmQufV6b2PMr9Lv0Ig/viewform?usp=sf_link
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScbEHaHSsaOVnbJN4sAcm8y_V-2bnkjZmQufV6b2PMr9Lv0Ig/viewform?usp=sf_link

Last modified: September 6, 2022

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *