*अतुल परचुरे गेले
*अतुल परचुरे कर्करोगाने गेले !*
अभिनेते … दारू, सिगार वगैरे व्यसने असणार… कर्करोग होईल नाहीतर काय ?
ऋषी कपूर, इरफान खान, फिरोज खान, टॉम अल्टर, विनोद खन्ना, राजेश खन्ना, नर्गिस … यादी मोठी आहे … सगळ्यांना लोक एकच लॉजिक लावतात … *व्यसन !* ओके !
कर्करोगाची चिकित्सा देत असताना,
रिसर्च पेपर वाचत असताना एक लक्षात येते,
एकही व्यसन नसलेल्या लोकात कर्करोग झपाट्याने दिसतो .. वाढतो !
व्यसन हे एक कारण आहे.
एकमेव कारण नाही !!
`हिंदुस्थानात “पार्सल “ सिस्टीम जेव्हा पासून प्रचलित झाली तेव्हा पासून गंभीर आजाराने डोके वर काढायला सुरुवात झाली असे माझे अनुमान आहे.`
*पॅक्ड फूड … सर्वात गंभीर आहे !*
एखाद्या गोष्टीचा शेल्फ लाईफ वाढवायची काय किंमत चुकवली जाते याचा आपल्याला अंदाज नसतो !
होटल , गाडे, ठेले इथे पदार्थ आकर्षक बनवायला काय दर्जाचे मटेरियल वापरले जाते आपल्याला माहीत नसते.
कर्करोगाची भीती असते पण कार्सिनोजेनिक एजंट माहीत नसतात … त्यामुळे आपण खात असलेल्या पदार्थाच्या वेष्टनावर ते पाहायचे समजत नाही !
एक्टीव्ह स्मोकिंग इतकेच पॅसिव्ह स्मोकिंग भयंकर असते याची कल्पना नसते !
फ्रिज मधे ठेवलेल्या अन्नाचे २-३ दिवसाने कशात रूपांतर होते याचा अंदाज नसतो .. वरुन फ्रेश दिसते म्हणजे उत्तम !
भाज्यांवर फळांवर किती कीटकनाशके फवारलेली असतात, माहीत नसते … मी रुग्णांना आवर्जून सांगतो .. फळांचा अट्टाहास टाळा!
प्लास्टिक बाटली – कंटेनर- पिशवी यातून किती नॅनो पार्टिकल शरीरात जातात याची मोजदात नसते.
अजून काय … किती …. विचार करून , सांगून थकायला होते.
कर्करोगापासून वाचायचा एकच मार्ग,
तो होऊन न देणे !
हे आपल्या हातात आहे का ?
काही प्रमाणात आहे … !
जुने नियम पुन्हा अमलात आणा,
संपेल तितकेच बनवा
लागेल तितकेच विकत आणा,
पाकीटबंद पदार्थ – ज्यूस टाळा,
मिनरल वॉटर बंद करा ..
प्लास्टिक मधून जेवण आणू- वाढू नका !
सप्त धातू त्रिदोष त्रिमल याना संतुलित करायला आयुर्वेद अंगिकारा !!
व्यसनी लोकांना माहीत असते याच्यामुळे मला कर्करोग झाला.
सुपारी च्या खंडाचे व्यसन नसणाऱ्या लोकांना जेव्हा कर्करोग होतो तेव्हा रुग्णाला येणारी मानसिक अस्वस्थता , रोगापेक्षा भयंकर असते !
अतुल हे कर्करोगाने गिळलेले अजून एक पान !!
*वैद्य. अंकुर देशपांडे*