नाशिक (दि. १३ जून २०२५): लवटे नगर, नाशिक रोड परिसरातून एक २५ वर्षीय महिला अचानक बेपत्ता झाली आहे. रोजीना निरज माल (वय २५), रा. प्लॉट नं. ०५, माल निवास, जय भवानी रोड, लवटे नगर, नाशिक रोड या महिलेने दिनांक १३ जून २०२५ रोजी रात्री १०:३० वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घरातून कुणालाही काही एक न सांगता अचानक घर सोडले.
पती निरज राम माल यांनी नातेवाईक, मित्र, परिसर व रेल्वे स्टेशन आदी ठिकाणी शोध घेतल्यानंतरही पत्नीचा काहीही ठावठिकाणा लागला नसल्याने उपनगर पोलीस स्टेशन येथे मिसिंगची तक्रार दाखल केली आहे.

🔍 हरवलेल्या महिलेचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे:
-
नाव: रोजीना निरज माल
-
वय: २५ वर्षे
-
उंची: ५ फूट
-
रंग: गोरा
-
शरीरयष्टी: सडपातळ
-
चेहरा: गोल
-
नाक: सरळ
-
डोळे: काळे
-
केस: काळे व लांब
-
भाषा: हिंदी व नेपाळी बोलते
-
शेवटचे अंगावर होते: पांढऱ्या रंगाचा सुट, त्यावर पिवळ्या रंगाचे फुलांचे डिझाइन, लाल रंगाची सलवार
-
सोबत: एम. आय. रेडमी कंपनीचा मोबाईल
कोणालाही सदर महिला दिसल्यास किंवा माहिती असल्यास खालील नंबरवर तात्काळ संपर्क साधावा: 📞 संपर्क: ७४९८८१०८३८ (निरज राम माल)
———————————————————————————————————————————————————————————————————————
प्रारतिनिधी – राजू ठाकरे – ९९२१० २०१११
