
🏆 *शिरपूरचा अभिमान – हरपाल राजपूत यांचा पोलीस निरीक्षकांकडून सन्मान!* 🏅
शिरपूर (प्रतिनिधी) – जगभरातील 297 हून अधिक बॉडी बिल्डिंग स्पर्धांमध्ये यशस्वीरीत्या पदके पटकावणारे, दहा वेळा उत्तर महाराष्ट्र श्री, आठ वेळा महाराष्ट्र श्री, चार वेळा भारत श्री तसेच चार वेळा मिस्टर युनिव्हर्स हा प्रतिष्ठेचा किताब जिंकणारे आणि इराण देशात मिस्टर वर्ल्ड हा गौरव प्राप्त करणारे शिरपूर येथील सुपुत्र हरपाल राजपूत यांचा शिरपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोरसिंग परदेशी यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.
सन्मान सोहळ्यावेळी पोलिस निरीक्षक परदेशी यांनी हरपाल राजपूत यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व त्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरी ही शिरपूरसाठी अत्यंत अभिमानास्पद असल्याचे सांगितले. “या मातीतून असे जागतिक पातळीवर झळकणारे रत्न निर्माण होत असतील, तर ती माती धन्य आहे,” असे उद्गार त्यांनी काढले.
हरपाल राजपूत यांनी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून आपली जिद्द, शिस्त आणि परिश्रमाच्या जोरावर बॉडी बिल्डिंगमध्ये जागतिक स्तरावर आपली छाप सोडली आहे. त्यांनी सांगितले, “शरीर घडवताना केवळ व्यायाम नव्हे तर मन, विचार आणि जीवनशैलीही शिस्तबद्ध करावी लागते. मी आज जे काही आहे, ते या मातीतल्या प्रेरणेमुळे आहे.”

सन्मानप्रसंगी उपस्थित असलेल्यानी टाळ्यांच्या गजरात राजपूत यांचे कौतुक केले. अनेक तरुणांसाठी प्रेरणास्थान ठरलेल्या या कार्याने राजपूत समाजात व शिरपूर शहरात आनंदाचे वातावरण होते.
🌟 राजपूत समाजाचा अभिमान आणि शिरपूर नगरीचा तेजस्वी चेहरा ठरलेले हरपाल राजपूत यांना सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील आंतरराष्ट्रीय वाटचालीसाठी अनेकांच्या शुभेच्छा त्यांच्याबरोबर आहेत.
📰 दैनिक राष्ट्र उदय आणि पोलीस टुडे परिवाराकडून हरपाल राजपूत यांना पुढील वाटचालीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा…!
या गौरवप्रसंगी अनेकांनी त्यांच्या यशस्वी वाटचालीचे कौतुक केले. एकेकाळी ग्रामीण भागातून उभा राहून जागतिक पातळीवर नावलौकिक मिळवणाऱ्या *हरपाल राजपूत* यांनी तरुणांसाठी प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.
🌟 रा
जपूत समाजाचा अभिमान, आणि शिरपूर नगरीचा *तेजस्वी चेहरा* ठरलेले *हरपाल राजपूत* यांना समाजातून व सर्व स्तरांतून *शुभेच्छांचा वर्षाव* होत आहे.
*दैनिक राष्ट्र उदय व पोलीस टुडे* परिवाराकडून *हरपाल राजपूत* याला हार्दिक हार्दिक *शुभेच्छा*
👊💪 *”शाब्बासकीची थाप”* त्यांच्या पाठीशी असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा…!

