दि. १० फेब्रुवारी २०२६ रोजी मा. श्री संदिप कर्णिक, पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांच्या संकल्पनेतून शालेय विद्यार्थ्यांसाठी दर मंगळवारी “पोलीस आयुक्त कार्यालय प्रत्यक्ष पाहणी (Walk in Tour of Nashik City Police)” हा अभिनव शैक्षणिक उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना पोलीस आयुक्त कार्यालयातील कार्यपद्धतीची प्रत्यक्ष माहिती मिळावी तसेच विविध शाखांचे कामकाज जवळून पाहण्याची संधी उपलब्ध करून देणे हा आहे. दर मंगळवारी हा उपक्रम नियमितपणे राबविण्यात येत आहे.
सदर कार्यक्रमांतर्गत Podar International School येथील ६८ विद्यार्थ्यांनी पोलीस आयुक्त कार्यालयास भेट दिली. या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना आयुक्तालयातील आवक-जावक शाखा, चारित्र्य व पासपोर्ट पडताळणी शाखा, नियंत्रण कक्ष, डायल ११२ सेवा, ट्रॅफिक कंट्रोल कक्ष, वाहतूक नियमांबाबत जनजागृती उपक्रम, वाहतूक विभागामध्ये वापरली जाणारी आधुनिक उपकरणे तसेच सायबर क्राईम संदर्भातील माहिती देण्यात आली.

विद्यार्थ्यांना माहिती देताना पोलीस हवालदार सचिन जाधव
पोलीस आयुक्त श्री संदिप कर्णिक यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून पोलीस दलाचे कार्य, कर्तव्यनिष्ठा व सामाजिक जबाबदारी याबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनीही उत्साहाने प्रश्न विचारून पोलीस प्रशासनाची कार्यप्रणाली जाणून घेतली.
सदर कार्यक्रमास श्रीमती किरिथिका सी. एम., पोलीस उपयुक्त, श्रीमती अद्विता शिंदे, सहा पोलीस आयुक्त, श्री संजय पिसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नाशिक शहर तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका व शिक्षक उपस्थित होते.
विद्यार्थ्यांमध्ये कायदा व सुव्यवस्थेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी व पोलीस प्रशासनाविषयी सकारात्मक दृष्टीकोन तयार करण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरत असून, नाशिक शहर पोलीस दलाचा हा प्रयत्न कौतुकास्पद मानला जात आहे.
संदिप धात्रक मो. 9420000942 🇮🇳
