नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत येणाऱ्या पंचवटी पोलीस ठाणे हद्दीत महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी आज रूट मार्च काढण्यात आला.

सदर रूट मार्चला पंचवटी पोलीस ठाणे येथून सुरुवात करून दिंडोरी नाका, पंचवटी कारंजा, मालेगाव स्टॅन्ड, मखमलाबाद नाका, पेठ नाका, शनि मंदिर, तीन पुतळे, फुलेनगर परिसर या मार्गावरून रूट मार्च काढण्यात आला. त्यानंतर पुन्हा पंचवटी पोलीस ठाण्यापर्यंत रूट मार्च पूर्ण करण्यात आला.

या रूट मार्चमध्ये शेखर देशमुख, सहाय्यक पोलीस आयुक्त, पंचवटी विभाग,गजेंद्र पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पंचवटी पोलीस स्टेशन,सुनील पवार, पोलीस निरीक्षक, श्रीमती आमने, पोलीस निरीक्षक यांच्यासह पंचवटी पोलीस ठाण्यातील इतर अधिकारी, पुरुष व महिला पोलीस अंमलदार सहभागी झाले होते.
तसेच आरसीपी प्लाटून, मुंबई नाका, आडगाव, म्हसरूळ, गंगापूर सीआर मोबाईल तसेच आरसीपी प्लाटूनची वाहने व स्टाफ मोठ्या संख्येने रूट मार्चमध्ये उपस्थित होते.

सदर रूट मार्च सायंकाळी 04:50 वाजता सुरू होऊन 05:55 वाजता संपन्न झाला. रूट मार्चमुळे नागरिकांमध्ये कायदा सुव्यवस्थेबाबत विश्वास निर्माण झाला असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कडक बंदोबस्त असल्याचा संदेश देण्यात आला आहे.
संदिप बबनराव धात्रक
अतिथी संपादक 9420000942
