दिनांक 17 फेब्रुवारी 2026 रोजी सिंहस्थ हॉल, नाशिक शहर पोलीस आयुक्तालय येथे मा. संदिप कर्णिक, पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांच्या संकल्पनेतून तसेच श्रीमती किरिथिका सि.एम, पोलीस उपायुक्त, नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनाखाली “रस्ता सुरक्षा अभियान 2026” अंतर्गत “आदर्श रिक्षा चालक व कर्तव्यनिष्ठ रिक्षाचालक” या विषयावर लोगो चित्रकला स्पर्धा उत्साहात पार पडली.

प्रमाणपत्र प्रदान करताना सहाय्यक पोलीस आयुक्त अद्विता शिंदे समवेत पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे
शहरातील आदर्श व धाडसी रिक्षाचालकांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने आयोजित या स्पर्धेत नाशिक शहरातील 35 शाळांमधील 430 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी रस्ता सुरक्षा, शिस्त, कर्तव्यनिष्ठा आणि सामाजिक जबाबदारी या संकल्पनांना आपल्या चित्रांमधून प्रभावीपणे मांडले.
🏆 स्पर्धेतील विजेते विद्यार्थी:
🥇 प्रथम क्रमांक:
कु. शहा खादीजा अजूर रेहमान – युथ नॅशनल हायस्कूल, वडाळा
🥈 द्वितीय क्रमांक:
कु. दूर्वा पाटील – होरायझन अकॅडमी CBSE, गंगापूर रोड
🥉 तृतीय क्रमांक:
कु. दूर्वा योगेश शेठ – चव्हाण गर्ल हायस्कूल, नाशिक रोड
कु. अनुष्का विनय पंडित – सिंधू सागर अकॅडमी, नाशिक
🎖️ उत्तेजनार्थ पारितोषिक विजेते:
कु. शेख दानिया झाकीर – युथ नॅशनल हायस्कूल, वडाळा
कु. आरोही कृष्णा खरे – मनपा शाळा क्र. 74, जाधव संकुल, सातपूर
कु. राशी प्रशांत किनगे – विद्या प्रबोधिनी प्रशाला
कु. आर्यन नितीन सोनवणे – आदर्श विद्यामंदिर, नाशिक रोड
कु. शक्तीसिंग निलेश पाटील – फ्रावशी टाउन अकॅडमी
कु. आयुष सुशील शिंदे – फ्रावशी टाउन अकॅडमी
कु. ओवी अमोल बर्वे – मराठा हायस्कूल, नाशिक
विजेत्या विद्यार्थ्यांचा सन्मान श्रीमती अद्विता शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त तसेच श्रीमती तृप्ती सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करून करण्यात आला.
स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली.
या कार्यक्रमास शहर वाहतूक विभागातील पोलीस अधिकारी व अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती करताना विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करण्याचा हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरला.
🇮🇳 रस्ता सुरक्षा – सर्वांची जबाबदारी! 🚦
संदीप धात्रक – अतिथी संपादक
मो. 9420000942
