आमदार रमेश बोरनारे यांची कडोली भव्य सत्संग आश्रमाला भावूक भेट

मराठी राजकारणातील नामांकित व्यक्तिमत्त्व आणि वैजापूर मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार म्हणून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर निवडून गेलेले आमदार रमेश बोरनारे यांनी आज रोजी दुपारी श्रीगुरुवर्य मोठेबाबाजी अंकुलनेरकर यांच्या दर्शनासाठी नागपूर जिल्ह्यातील कढोली आश्रमाला सदिच्छा भेट दिली.

 

 

आश्रमात दाखल होताच त्यांनी सर्वप्रथम देवपूजा हॉलमध्ये जाऊन देवपूजा वंदन केले, तसेच पुरुष भिक्षुकांच्या सोप्यांमध्ये फेरफटका मारत आश्रमातील विविध व्यवस्था मनोभावे पाहून घेतल्या. चार महिने आश्रमातील साधना आणि आठ महिने फिरस्ती अशी अद्वितीय जीवनपद्धती अंगीकारलेल्या सुमारे ३,००० महानुभाव साधुसंतांच्या त्यागमय जीवनशैलीने ते अत्यंत प्रभावित झाले.

 

आमदार साहेबांनी यावेळी सांगितले की,

“मी अनेक संप्रदाय पाहिले, पण महानुभावांची त्यागवृत्ती काही औरच आहे. त्यांच्या शांत, सात्विक आणि निस्पृह वृत्तीने मी भाळलो आहे.”

 

नम्रतेचा उल्लेखनीय प्रत्यय

 

श्रीगुरुवर्य मोठेबाबाजींच्या भेटीस जाताना आमदार बोरनारे यांनी अत्यंत नम्रतेने डोक्यावर रुमाल बांधला—ही नम्रता आश्रमातील सर्वांच्या लक्षात राहील अशी होती.

राजकीय क्षेत्रातील व्यक्ती असूनही इतकी साधेपणा आणि विनम्रता दाखविणे हे त्यांच्या अंतःकरणातील शुद्धतेचे द्योतक असल्याचे आश्रमातील सेवकांनी नमूद केले.

 

सेवाभावाची प्रामाणिक भूमिका

 

हरिहर पांडे यांनी बाबांना आमदार साहेबांचा परिचय करून देताना सांगितले की,

“बोरनारे साहेब अतिशय सात्विक; त्यांना कुठलेही व्यसन नाही—अगदी सुपारीसुद्धा नाही.”

 

त्यावर बाबांनी कानडगाव–जामगाव मंदिरासाठी रस्त्याच्या कामाकडे लक्ष द्यावे, असे सुचविले.

आमदार साहेबांनी तत्काळ उत्तर दिले—

“कानडगावचा रस्ता मी मंजूर केला आहे. जामगाव माझ्या मतदारसंघात नसले तरीही मी प्रयत्न करतो. १०–१२ ठिकाणी सभागृहे, भक्तनिवास आणि रस्ते मी स्वतः मंजूर केले आहेत.”

त्यांच्या या सकारात्मक प्रतिसादाने बाबांनी त्यांना शाल व श्रीफळ प्रदान करून आशिर्वाद दिला.

 

शिवसेना गटनेते म्हणून ठाम भूमिका

हरिहरभाऊंनी आमदार साहेबांना पुन्हा बोलावून खडकुली विषयाबाबत बाबांशी चर्चा घडवून आणली.

आमदार साहेबांनी ठाम शब्दांत सांगितले—

“शिवसेना गटनेते म्हणून सर्व ४० आमदारांची जबाबदारी मी घेतो. हा विषय मी मनापासून पाहीन.”

यावर बाबांनी संतोष व्यक्त केला.

निघताना आमदार साहेब आश्रमाच्या सौंदर्याने भारावून गेल्याचे सांगत होते. तेव्हा एका सद्भक्ताने नम्रपणे सांगितले—

“सर, जेव्हा कुणी आश्रम पाहतो तेव्हा भावूक होतो; आणि जर दान किंवा अन्नदानाची भावना आली तर पुढील तीन वर्षांच्या पंगती आधीच बुक आहेत. वेटिंग सुरू आहे.”

 

हे ऐकून आमदार साहेबांनी आश्चर्याने भुवया उंचावल्या आणि म्हणाले—

“फार समाधान वाटले

. पुन्हा येण्याची मनापासून इच्छा आहे.”

 

 

संदिप बबनराव धात्रक – 9420000942

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!