नंदुरबार  l प्रतिनिधी

नंदुरबार येथील लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाचे जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष टि.जाधव दिनांक 30 सप्टेंबर रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. नाशिक विभागीय कार्यालयतर्फे सेवानिवृत्तीनिमित्त त्यांचा सन्मान करण्यात आला तर नंदुरबार जिल्हा कार्यालयातर्फेही कोरोना पार्श्वभूमीवर मोजक्या अधिकारी व नागरिकांच्या उपस्थितीत निरोप देण्यात आला.नंदुरबार जिल्ह्यात शिरीष टि. जाधव यांच्या कार्यकाळात अनेक शासकीय आणि निमशासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यावर लाच स्वीकारल्या प्रकरणी कारवाई झाली होती.

नंदुरबार लाचलुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक शिरीष जाधव  यांनी त्यांच्या कार्यकाळात 51 आरोपींवर कारवाई केली.लोकसेवकांवर अन्याय होऊ न देता येणाऱ्या तक्रारदाराला त्यांनी न्यायचं दिला.त्यांनी मुंबई, अहमदनगर, रायगड, ठाणे ग्रामीण, धुळे, दोंडाईचा, मुंबई, व नंदुरबार अशा ठिकाणी सेवा दिली. त्यांनी  जादुंच्या प्रयोगातून कोरोना  काळात जनजागृती केली.

नाशिक विभागाचे लाचलुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक श्री सुनील जी कडासने साहेब यांनी देखील त्यांच्या कार्याची दखल घेऊन शुभेच्छा दिल्या आहेत.

नंदुरबार लाचलुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक शिरीष जाधव  यांच्या सेवानिवृत्ती निमित्त भारत मातेची प्रतिमा भेट देऊन पत्रकार महादू हिरणवाळे यांनी सत्कार केला.यावेळी पत्रकार वैभव करवंदकर, उत्तम महाजन, संजय गुमाणे, मनोहर बोरसे, दीपक चित्ते ,संदीप नावडेकर,अमोल मराठे, PI वाघ,  ज्योती शिरीष जाधव, प्रमिला जाधव, अनिकेत जाधव, ऋषिकेश जाधव कार्यक्रमास हजर होते.

श्री जाधव साहेब यांच्या पुढील सेवानिवृत्तीच्या वाटचालीस पोलीस टुडे परिवार दैनिक राष्ट्र उदय परिवार व त्यांचे मुंबई येथील चहाते भाजपचे ज्येष्ठ नेते दिलीप जैन अशा अनेक मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्यात पोलीस टुडे आणि दैनिक राष्ट्र उदय परिवाराचे ते पारिवारिक सदस्य असल्याने त्यांना पुन्हा शुभेच्छा

Last modified: October 4, 2021

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *