विकासाला समानार्थी शब्द : अमरीशभाई

Uncategorized

विकासाला समानार्थी शब्द : अमरीशभाई

✍️ 🚨पोलीस टू डे!!

१९८५ पासून अमरीशभाई शिरपूरचे लीडर आहेत. त्यांच्या विकासात्मक दृष्टीकोनातून या तालुक्याचा कायापालट झाला. शिक्षणाची नवी दालने खुली झाली. शेतीला पाणी मिळाले. हातांना काम मिळाले. उत्तुंग स्वप्ने पाहण्याची आणि ती प्रत्यक्षात आकारण्याची क्षमता तरुणाईत झाली. आणि सामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवून केलेले नियोजन हे त्यांचे होते. ते आजही टिकून आहे. त्यांच्या नावाचा उल्लेख जिथे होतो, तिथे आदर निर्माण होतो. त्वामागे मोठी तपश्चर्या आहे. जयश्रीबेन पटेल यांची साथ आहे. भूपेशभाईसारख्या निरपेक्ष माणसाची पुण्याई आहे. अमरीशभाईंच्या विविध क्षेत्रातील कार्याचा आढावा पेण्याचा त्यांच्या वाढदिवसानिमित्त हा प्रयत्न ।

पालिका झाली आत्मनिर्भर १९८५ मध्ये शिरपूरच्या नगराध्यक्षपदाच्या माध्यमातून अमरीशभाई पटेल समाजसेवेत सक्रीय झाले. त्यावेळी उत्पन्नाचे स्रोत मर्यादित होते. पैशाअभावी विकास नाही, विकासाअभावी उत्पन्न नाही अशा दुष्टचक्रात ही संस्था अडकली होती. अमरीशभाईनी पालिकेला स्वबळावर उभे केले. पालिकेच्या व्यापारी संकुलांची संख्या वाढवली. व्यापारी गाळे चावू लागले तशी शहरातील व्यावसायिकांना स्वयंरोजगाराची आणि पालिकेला दरमहा हमखास उत्पन्नाची सोय निर्माण झाली. पाठोपाठ शहरातील रस्त्यांचे जाळे विस्तारले. पेयजलाची सोय अद्ययावत केली. त्यामुळे शहराचा विस्तार वाढला. नव्या वसाहती उभ्या राहिल्या. विकासकर, पाणीपट्टी, मालमत्ता कराच्या माध्यमातून उत्पन्नाचे नवे साधन उभे राहिले. पाठोपाठ बंधू भूपेशभाई पटेल यांच्या माध्यमातून पालिकेच्या इंदिरा गांधी मेमोरिअल रुग्णालयाचे अद्ययावतीकरण करून घेतले. त्यासाठी मुंबई येथील दानशूर उद्योगपती मित्रांची मदत घेतली. उद्याने, रिक्रीएशन गार्डन, अॅम्युझमेंट पार्क, वॉटर पार्क अशा मनोरंजनपर सुविधांतूनही त्यांनी उत्पन्नवाढीचे मार्ग खुले केले. त्यामुळे शिरपूर पालिका स्वबळावर विकासकामे साकारण्याइतपत सक्षम झाली. आज २४ तास पाणीपुरवठा, भुयारी गटार योजना, सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प, १०० टक्के करवसुलीची परंपरा अशा अनेक वैशिष्ट्यांसह पालिका स्वावलंबी होऊन ताठ मानेने उभी आहे.

तालुका विकासाच्या मुख्य प्रवाहात १९९० मध्ये अमरीशभाई पटेल विधानसभेचे सदस्य म्हणून बहुमताने निवडून गेले. आमदारपदाच्या दीर्घ कार्यकाळात त्यांनी पायाभूत विकासाच्या सुविधा निर्माण केल्या. रस्ते, पूल आदिद्वारे आदिवासी, ग्रामीण भाग विकासाच्या मुख्य प्रवाहात आणला. दळणवळण सुलभ केले. परिणामी दुर्गम भागातील गावेही विकासाच्या मुख्य प्रवाहात सामील झाली. तेथील शेतकरी दैनंदिन गरजांसाठी सहजगत्या शहरापर्यंत पोहचू लागला. त्याला शेतीमाल घेवून दररोज विक्रीसाठी शहराच्या बाजारपेठेपर्यंत पोहचणे शक्य झाले. ग्रामीण भागातील विद्यार्थी दर्जेदार शिक्षणासाठी शहरात येऊ लागले. पालिकेतर्फे इंदिरा गांधी रुग्णालयाची सुविधा दिल्यानंतर रुणांना वेळेत उपचारासाठी दाखल करणे शक्य झाल्याने जिवितहानी नियंत्रणात आली.

शैक्षणिक आत्मनिर्भरता : बदलती शैक्षणिक परिस्थिती, नोकरीसाठी आवश्यक कौशल्यांची गरज लक्षात घेवून अमरीशभाई पटेल यांनी शिरपूर एज्युकेशन सोसायटी, आर.सी.पटेल शैक्षणिक संस्था, श्री विलेपार्ले केळवणी मंडळ आदिच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण देणार्या प्राथमिक, माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक, पदविका, पदवी, पदव्युत्तर, व्यावसायिक महाविद्यालयांची उभारणी केली. नियमित शिक्षणक्रमासह रोजगाराभिमुख अभ्यासक्रम देणार्या संस्था शिरपुरात आणल्या. मुंबई येथील एनएमआयएमएससारख्या नामवंत विद्यापीठाचे सप्ततारांकित ऑफ कॅम्पस सावळदेसारख्या ग्रामीण भागात उभारले. त्यामुळे महानगरांतील शिक्षण व आदिवासीबहुल शिरपूर तालुक्यातील शिक्षण यातली दरी सांधण्याचे फार मोठे कार्य साध्य झाले.

अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, व्यवस्थापनशास्त्र, कॉस्मेटिक्स आदि शाखांमधील शिक्षण शिरपुरातच उपलब्ध झाल्यामुळे गरजू विद्यार्थ्यांची मोठी सोय झाली. त्यांच्या पालकांवरील आर्थिक ताण सुसह्य झाला. शिरपूर सिक्स्टीसारख्या प्रकल्पातून आदिवासी भागातील गुणवंत विद्याथ्यांना शहरी विद्याथ्र्यांसोबत निवासी तत्वावर राहून स्वयंविकास साधण्याची संधी देण्यात आली. ही शैक्षणिक आत्मनिर्भरता शिरपूर तालुक्याचे प्रमुख गुणवैशिष्ट्ये म्हणून ओळखली जात असून खान्देशातील एज्युकेशनल हब अशी नवी ओळख निर्माण करून देणारी ठरली आहे. आगामी काळातील नियोजित कृषी विद्यापीठ, ७५० बेडचे अतिभव्य हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज ब्रँड शिरपूर देशभरात झळकवणार आहेत.

सिंचनातून स्वावलंबन : आमदारपदाच्या कारकिर्दीत अमरीशभाई पटेल यांनी सिंचनाचे महत्त्व लक्षात घेतले. शेती हाच सर्वकालीन सर्वोत्तम व्यवसाय आहे, नफ्याच्या शेतीसाठी व भविष्याची गुंतवणूक म्हणून पाण्याचे दीर्घकालीन स्रोत निर्माण केले पाहिजेत हे त्यांनी लक्षात घेतले. विहिर पुर्नभरणाच्या साध्या प्रयोगातून सुरवात केली. नाल्याचे खोलीकरण व रुंदीकरण करणे, माती भरल्याने बुजलेल्या कॅपिलरीज मोकळ्या करून प्रवाह जिवंत करणे अशा कार्यपद्धतीतून शिरपूर पॅटर्न बंधार्यांची मुहूर्तमेढ रोवली. तालुक्यातील लहानमोठ्या नाल्यांमधून वाहून जाणारे पावसाचे पाणी जागोजागी बांध घालून अडवले. कोट्यावधी लिटर पाणी जमिनीत | मुरले आणि शिरपूर पॅटर्न बंधार्यांचे दृश्य फायदे सर्वांनाच पहायला मिळाले. एक हजार फुटांहून अधिक खोल गेलेली भूजलपातळी ४०० फूटांवर आली. बंद पडलेल्या कूपनलिका जिवंत झाल्या. जेथे विहिरी नव्हत्या, तेथे स्वखर्चाने शेतकयांना डिझेल इंजिन्स देवून अमरीशभाईनी शेती सिंचनाखाली आणली. तालुक्यात एकूण ३०० बंधारे पूर्ण झाले असून आणखी ३०० बंधाऱ्यांचे नियोजन आहे. बंधारे बांधतांना नाल्यातून काढलेला सुपीक गाळ काठावरील पोटखराब क्षेत्रात पसरून ती लागवडीखाली आली. बांधकामादरम्यान तयार केलेल्या रस्त्यांमुळे थेट शेतात पोहचणे शेतकर्यांना शक्य झाले. आता त्यापुढे जाऊन कार्य सुरू आहे. पावसाळ्यातील पाण्याने काठोकाठ भरलेल्या बंधार्यांत मत्स्यबीजे सोडण्यात येत आहेत. नाल्यांकाठी फलोत्पादनासाठी वृक्षारोपण सुरु आहे. आगामी काळात स्थानिक गरजू शेतकऱ्यांना मत्स्यविक्री व फळविक्रीतून शाश्वत रोजगार उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शिरपूर पॅटर्न बंधाऱ्यांमुळे वर्षांतून दोन पिके घेणे शक्य झाले. भाजीपाला व केळीसारख्या नगदी पिकांची लागवड वाढली. आज सिंचन क्षेत्रात शिरपूर पॅटर्न ब्रँड म्हणून ओळखला जात असून जलयुक्त शिवारसारख्या योजनांचा प्रणेता ठरला आहे..

शाश्वत रोजगारनिर्मिती : कृषी उत्पादनांवर आधारीत प्रक्रिया उद्योग शेतकरी आणि बेरोजगार अशा दोन्ही घटकांसाठी संजीवनी ठरतात. त्याचे ठळक उदाहरण शिरपूर तालुक्यात दिसून येते. तालुक्यात कापसाची सर्वाधिक लागवड केली जाते. त्यावर प्रक्रिया करण्यासाठी उद्योग उभारण्याचे नियोजन अमरीशभाईंनी केले. त्यासाठी सहकारी तत्त्वावरील प्रियदर्शिनी सहकारी सूतगिरणीची निर्मिती त्यांनी केली. पाठोपाठ तांडे येथे टेक्सटाईल पार्कची स्थापना करून उद्योगांना निमंत्रण दिले. आज टेक्सटाईल पार्कच्या माध्यमातून हजारो हातांना रोजगार मिळाला आहे. विशेष म्हणजे गरजू महिला कामगारांसाठी या पाकमधील उद्योगांमध्ये स्वतंत्र जागा असून त्यांना सुरक्षित वाहतुकीची सुविधाही देण्यात आली. या उद्योगात आंतरराष्ट्रीय मानकांनुसार पीपीई सूट, एन ९५ मास्कसह अनेक ख्यातनाम उत्पादनांची निर्मिती होते. अगदी लाकडाऊनच्या काळातही येथील उद्योगांनी कामगारांना आधार दिला. सर्वाधिक महत्त्वाची बाब म्हणजे तालुक्यातील अर्धकुशल आणि अकुशल युवकांना शाश्वत स्वरूपाच्या रोजगाराची हमी या उद्योगांनी दिली. बेरोजगारी, बकालतेमुळे अनेक भागांमध्ये गुन्हेगारी वाढीस लागल्याची उदाहरणे दिसत असल्याच्या पार्श्वभूमीवर अमरीशभाईनी काळाची पावले ओळखून उद्योग क्षेत्राद्वारे शेतकरी आणि युवक अशा दोन्ही घटकांना दिलेला आधार त्यांच्या दूरदृष्टीची चुणूक दाखवणारा आहे.

काही शब्दांमध्ये अमरीशभाईंचे कर्तृत्व सामावणारे नाही. त्यांच्या कार्यकक्षा अफाट आहेत. नित्यदिनी नित्यनवा संकल्प करुन ते कार्यमग्र असतात. तालुक्याच्या विकासाची गंगा अखंड वाहती ठेवण्यासाठी त्यांना आरोग्यमय दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा !
– रत्नदीप सिसोदिया
┈┈••✦✿✦••✦✿✦••┈┈
✍️ 🚨पोलीस टू डे‼️

Last modified: September 28, 2023

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *