होमिओपॅथीचा प्रकाश हरपला…
होमिओपॅथीचा महामेरु असे ज्यांचे सार्थ वर्णन केले जात असे, त्या डॉ. सत्यप्रकाश भट्टाचार्य यांचे तीन सप्टेंबरला नाशिक येथे निधन झाले. ६० होऊन वर्षांच्या भट्टाचार्यांच्या मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने त्यांची प्रकृती गंभीर झाली होती. ती अधिक खालावत जाऊन त्यांचे निधन झाले.
जगण्याची आशा आणि इच्छा नष्ट झालेल्या अनेक अतिगंभीर रुग्णांना डॉ. सत्यप्रकाश यांनी अक्षरश: मरणाच्या दारातून परत आणले होते. सर्व पॅथींचे उपचार झाल्यानंतरही उपयोग होत नसल्याने अखेरचा पर्याय म्हणून डॉ. सत्यप्रकाश यांच्याकडे गेलेल्या रुग्णांपैकी अनेकांना त्यांनी संजीवनी दिली. शरीरप्रकृतीच्या कलाने द्यावयाची औषधयोजना, साइड इफेक्ट नसलेल्या औषधांचा वापर, रुग्णाच्या
समुपदेशनाची प्रभावी पद्धत यामुळे पहिल्या सेशनमध्ये च अनेक रुग्ण बरे जात. त्यांची लोकप्रियता अगाध होती.
पैशांसाठी त्यांनी व्यवसाय कधीच केला नाही. होमिओपॅथीवर त्यांची अतूट श्रद्धा होती. प्रत्येक रुग्णाकडे त्यांनी सेवेची संधी देणारे साधन म्हणूनच पाहिले. शिरपूर तालुक्यातील अनेक रुग्णांना त्यांनी हातोहात रोगमुक्त केले होते. त्यांना मानणारा मोठा वर्ग येथे आहे. अनेक होतकरु डॉक्टर्स त्यांच्या हाताखाली प्रशिक्षित होऊन सेवा बजावत आहेत. डॉ. सत्यप्रकाश यांच्या सेवाकार्याचा वसा आणि वारसा त्यांनी हिरीरीने पुढे न्यावा हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. डॉ. सत्यप्रकाश भट्टाचार्य यांना भावपूर्ण अभिवादन !
त्यांच्या अंत्ययात्रेला नाशिक पोलीस आयुक्तालयातील सहाय्यक पोलीस आयुक्त श्री वसंत मोरे साहेब मोतीवाला होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजचे चेअरमन विविध सामाजिक कार्यकर्ते त्यांचे लहानपणाचे अनेक मित्र पत्रकार नगरसेवक पोलीस टू डे चे संपादक रत्नदीप सिसोदिया पत्रकार राजू भाई सर्व नातेवाईक मित्र परिवार जनसमुदाय उपस्थित होता दैनिक राष्ट्र उदय व पोलीस टू डे परिवाराच्या वतीने विनम्र अभिवादन
होमिओपॅथीचा *प्रकाश* हरपला

Last modified: September 5, 2022