जादा दराने कापुस बियाणे विक्री करणा-या नंदुरबार येथील मे.संत श्री आसारामजी कृषी सेवा केंद्रावर गुन्हा दाखल

ब्रेकींग

जादा दराने कापुस बियाणे विक्री करणा-या नंदुरबार येथील मे.संत श्री आसारामजी कृषी सेवा केंद्रावर गुन्हा दाखल

भरारी पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे जादा दराने कापुस बियाणे विक्री करणाऱ्या नंदुरबार तालुक्यातील बियाणे विक्रेता मे.श्री संत आसारामजी कृषी सेवा केंद्रावर कारवाई करण्यात आली आहे.

भरारी पथकाने त्यांचा समक्ष एक बनावट ग्राहक पाठवून एका नामांकित कंपनीचे बियाण्याची दोन पाकीटांची मागणी केली.

बियाणे विक्रेत्याने सदरचे पाकिटे रक्कम रुपये ८६४ /- प्रति पाकीट किंमत असताना बनावट ग्राहकाकडून रक्कम रुपये 1200/- ची मागणी केली मात्र सदर बियाणे पाकिटे विक्री पोटी बिल देताना रक्कम रुपये प्रति बियाणे पाकीट याप्रमाणेच दिले.

बनावट ग्राहकाने पाकीट ताब्यात घेतल्यानंतर तातडीने भरारी पथकाने छापा मारून सर्व पाकिटे जप्त केली.
महाराष्ट्र कापूस बियाणे कायदा २००९, बियाणे कायदा १९६६, बियाणे नियंत्रण आदेश १९८३, अत्यावश्यक वस्तू कायदा १९५५ व भादंवि १८६० मधील कलम ४२०/३४ अन्वये श्री.योगेश हिवराळे, पंचायत समिती कृषी अधिकारी यांनी नंदुरबार पोलीस स्टेशन ता.जि. नंदुरबार येथे वरील कायद्यान्वये
मे. संत श्री आसारामजी कृषी सेवा केंद्र परवानाधारक
रवींद्र रमेश पाटील विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

श्री.मोहन वाघ, विभागीय कृषी सहसंचालक नाशिक विभाग नाशिक, श्री.सी. के.ठाकरे,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नंदुरबार व श्री किशोर हाडपे, कृषी विकास अधिकारी जि.प.नंदुरबार, श्री उल्हास प्रल्हाद ठाकूर तंत्र अधिकारी गु.नी. विभागीय कृषी सहसंचालक कार्यालय नाशिकयांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाने ही कारवाई केली आहे.

या कारवाईसाठीश्री स्वप्निल शेळके जिल्हा गुणवत्ता नियंत्रक निरीक्षक, श्री विश्वजीत पाडवी ता. कृ .अ. नंदुरबार, श्री सचिन देवरे मोहीम अधिकारी नंदुरबार,श्री.प्रकाश खर्माळे कृषी अधिकारी पंचायत समिती अक्कलकुा व कृषी सहायक पंकज धनगर यांनी परिश्रम घेतले.
सदर कारवाईच्या अनुषंगाने विभागीय कृषी सहसंचालक मा.मोहन वाघ यांनी नाशिक विभागातील सर्व शेतकरी बंधूंना आवाहन केले आहे की कुणीही जादा दराने कृषी निविष्ठा खरेदी करू नये.अधिकृत परवानाधारक विक्रेत्याकडून खरेदी करताना पक्की पावती मागावी.

कृषी निविष्ठा खरेदी करताना अडचण असल्यास शेतकरी बांधवांनी कृषी विभागाकडे तात्काळ संपर्क साधावा. याबाबत शेतकऱ्यांच्या कैफियत जर का कृषी विभागाचे अधिकारी ऐकत नसतील तर आपण तात्काळ आमच्या खालील दिलेल्या नंबर व मेल आयडी वरती संपर्क करून सांगू शकतात निश्चितपणे आपल्या तक्रारी वरिष्ठान पर्यंत पोहोचून मार्गी लावण्याचा प्रयत्न करू

▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬
वाचा ही बातमी,  फक्त ईथे बोट ठेउन उघडा*👇👇👇
https://policetoday.org

*🙏घरी रहा सुरक्षीत रहा, आपण सुरक्षीत तर बाकीचे सुरक्षीत🙏*

*रत्नदीप सिसोदिया*
मुख्य संपादक POLICETODAY
८ निर्मला अपार्टमेंट शरनपुर रोड
कनडा काॅर्नर नाशिक-5
+918888812020
+919738933933

+919764919100
policetoday100@gmail.com
www.policetoday.org
www.100helpline.org
policetoday.2019@gmail.com

▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬


🙏🙏🙏

Last modified: June 13, 2024

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *